Thursday, July 10, 2008

अजून एक कन्टाळवाणी नोंद - Basically ऐकायचा कन्टाळा

एक प्रकारचा रागीट कंटाळा आला आहे आता !
Basically या शब्दाने प्रचंड उच्छाद मांडला आहे. १० पैकी कमीत कमी सॉफ्टवेअर इंजिनियर तरी, दर वाक्यांनंतर पुढचे वाक्य Basically ने सुरु करतात.
किती वर्षे सहन करावे माणसाने ? जवळ-जवळ Engg. F.E. पासून ते आजतागायत सहन करतोय मी हे ! ओरल मधे तेच, कांफ्रेंस कॉल मधे तेच, साध्या गप्पा मारताना सुधा Basically ? ऐकणारे सगळे कन्टाळले, वैतागले, पण हे बेसिक वीर काही दमत नाहीत! जाहीर बंदी घातली पाहिजे ह्या शब्दावर

बेसिकली वरून १२ वी मधला एक किस्सा आठवला. Chemistry च्या आठल्ये सरांच्या क्लासला, एक हीरो खूपच उशिरा आला, सरांनी कारण विचारल्यावर जी लांबड लावली ना पठ्ठ्याने..."सर बेसिकले असे झाले ना...", ५ मिनिटांनी त्याचे पुराण संपल्यावर, सरांनी त्याला विचारले, "बाळा, बेसिकली हे सगळे असे झाले आता असिडीकली kaay झाले ते सांग पाहू" - कुत्र्यापेक्षा पण बेक्कार हसला फुल क्लास त्याला !
असो. मला वाटते, ही पहिली रागीट कंन्टाळ्याची नोंद असावी ब्लोगवर.
Welcome, रागीट कंटाळा...

3 comments:

Sak said...

Basically Kup chan lihale aahe!! ha ha ha

Ruyam said...

apan tya 3/10 madhale.
apalyala pan basically awadat nahi.

btw, (he ajkal far waparato mi... hyacha kantala ala ka tumhala?) Athale class mhanje chukun tumhi Kolhapuri tar nahi na???

chuk bhul timb timb

Ruyam said...
This comment has been removed by the author.