Friday, March 20, 2009

अजुन एक कंटाळा नोंद(भविष्यातील)

असे म्हणतात ना की, माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीची मनोभावे भक्ती करतो तेव्हा तो त्यात पूर्णपणे विरघळून जातो.

कोणी नाही म्हणत असे, **च्या गावात, फंडे एक-एक.

आता आम्ही कंटाळ्याशी एवढे एकरुप आणि समरस झालो आहोत की, कंटाळा कधी येणार तेपण आम्ही प्रेडिक्ट करु शकतो ! विश्वास बसत नसल्यास आज आत्ता ताबडतोब सिध्द करतो.
‘आज आत्ता ताबडतोब’ - ही हा, एवढा मोठा झाला तरी अतुल परचुरे कसला गोड लहान बाळासारखा दिसतो राव.

तर आत्ताच मी सांगतो - उद्या मला तेच तेच वाचण्याचा कंटाळा येणारे. तेच तेच आणि तेच तेच, गेली अनेक वर्ष वाचतो आहे.
उद्या भारतातले जेवढे म्हणून पेपर उघडीन त्यातल्या निम्म्या पेपरमधे बातमी असेल, परत जुना सचिन दिसला. मला जर फिजिकली भेटला ना असे म्हणणारा कोणी उद्या तर आईशप्पथ फटकावीन.
"आज परत इतक्या दिवसांनी जुना सचिन बघायला मिळाला", खेळाच्या पहिल्या पाच मिनीटातच सचिनचे फटके बघुन कळाले, आज मैदानावर जुना सचिन खेळतोय".
ईयत्ता पाचवीत असल्यापासून हेच ऐकत/वाचत आलो आहे.

एवढा जुना साचलेला कंटाळा आहे ना हा, आणि तोंड वेंगाडत परत परत येतो असली छपरी वाक्ये ऐकुन. या कंटाळ्याचे वर्गीकरण करायची वेळ आली तर अतिमहारागीट कंटाळा असे करीन मी.

या लोकांना टाईम मशिनमधून ४-५ वर्षांच्या सचिनचा खेळ दाखवायला नेले आणि दुर्दैवाने त्याने एखादा जरी बॉल मिस केला तर म्हणतील "छे, चक चक, चक चक, पूर्वी काय खेळायचा सचिन, वर्षाचा असताना मस्त फॉर्ममधे होता, पूर्वी महान होता आता एक सामान्य प्लेयर झाला आहे"


कंटाळवाण्या मित्रांनो लक्षात घ्या - एकच सचिन आहे या जगात, जो कायम चांगलाच खेळतो, जुना/नवा अशी काय भानगड नाही. नवीन सचिन बघायचा असेल तर त्याची परवानगी घेवून अर्जुनला बघुन या.

आता कंटाळा पोस्टसची रिच्युअल झाल्याने गाणे आठवलेच - रश च्या ‘टॉम सॉअर’ गाण्यामधे वेगळ्या संदर्भात आहेत ह्या ओळी. पण चालते हो, चांगल्या लागू होतात सचिनला. आठवले तर लिहून टाकावे

A modern day warrior
mean mean stride,
Todays tom sawyer
mean mean pride.
...
Catch the mist, catch the myth
Catch the mystery, catch the drift.
....
(Today's Tom Sawyer - Rush)

***

4 comments:

Bhagyashree said...

:)

Maithili said...

evdha MAHARAGIT KANTALA aalay? direct fatkavin vaigare?
take a chill pill, dada.
BTW post nehami parmanech zakkas...

Deep said...

o bhau kantalyaacha kantala kasa naahi aalya ;) :D

Meghana Bhuskute said...

__/\__