Wednesday, February 25, 2009

अजुन एक कंटाळा नोंद

नेहमीप्रमाणे अजुन एक कंटाळा. आज एक नवीन हायब्रीड संकरीत मिश्र असा कंटाळा आला आहे. ऑफिसमधले राजकारण आणि भारत/अमेरिका वाद यांचे हायब्रीड.
म्हणजे भारतातले ऑफिस आणि अमेरीकेतले ऑफिस यांचे आपापले स्वत:चे सार्वभौम राजकारण आहेच पण त्याचा कंटाळा नाही आला आत्ता. आत्ता भारतातले ऑफिस आणि अमेरीकेतले ऑफिस यांच्यात जी काय म्हणून रंगलेली असते त्याचा कंटाळा आलाय.
मनात नसूनपण जेव्हा कधी कधी निरुपाय म्हणून असे काही राजकारण करावे लागते तेव्हा वाईट वाटते बुवा. असे हल्ली सारखे सारखे आंतर्देशीय राजकारण करुन बेक्कार कंटाळा आला आहे. मी असे काही राजकारण करणार नाही असे पण करता येत नाहीये.
पिक्चरमधे एखादा गँगस्टर कसा दाखवतात, की जो मनात असूनही परत चांगल्या मार्गाला लागू शकत नाही तसे झाले आहे. गुनाह की ईस राह को लगना तो आसान है लेकिन मुडके वापस जाना मुश्कील है...ही ही हा हा हा हा

‘हू’ च्या बीहांईड ब्ल्यू आईज मधे असल्या सही ओळी आहेत -

No one knows what it's like,
To be the bad man
...
No one knows what it's like,
To feel these feelings
Like I do
And I blame you
*
कंटाळा ब्लॉग लिहिताना कायम गाण्याच्या ओळी का आठवतात ?
***

6 comments:

me said...

boss! tu mahan hai!!!!!!! tuze charan kamal kuthe aahe? are zkas lihitos yaar! me kuthalach blog wachun itki hasale nawhate! u rock dude!

Yawning Dog said...

चरणकमल नकोत हो लगेच...धन्यवाद :)

Mahendra Kulkarni said...

आणी किऑस क्यु मधे वेळ गेल्याने .तुमचा ब्लॉग नेहेमी वाचतो.. छान लिहिता. तुमची भाशःआ शैली खुपच छान आहे. . तुमचं लिखाण वाचलं की एकदम फ्रेश फिल येतो.. पुढील लिखाणा करता शुभेच्छा.

KUNAL THAKUR said...

जीवनाचा खूप कंटाळा आला आहे!!!काही सुचत नाही, कोणी सर्वात जवळचा मित्र मला नाही, दुख कोणाला सांगता येत नाही काही नाही काही नाही !!!!!! आत्महत्या कराविशी वाटते खूप कंटाळा आला आहे

Yawning Dog said...

Kunala bhava maru nakos.

Changla hatta katta porga tu anee atmahatya kay kartos?
Ajun kityek Kantale enjoy karayche ahet tula. Melyavar tar laych kantala yeto mag kay fayda....chhote chhote jagatanache anek kantale astat te masta astat.

Javalcha mitra nasla mhanun kay zale...computer ha mitrach ahe javalcha, pustakae vaach, cineme bagh.
Cinema tar maza saglyaat javalcha mitra.

Ata tu tp mhanun lihile asasheel taree kahee harkat nahee, pan in geenral kantalyavar maran he uttar nahee naytar lahanpanich mele astee sagale jan?

Pratyek jambhai anee kantala vegla asto he dhyanaat thev anee ajun ayushyaat anek kantalae baghayche ahet tula.

Jamale tar doctorankade pan ja, te upay sangteel yogya !

Anup Barve said...

tuzhya-mazhya sarkhe lok kantalyachi saath sodun jayla lagle tar kantalyalach atmahatya karavi lagel ki!
Kantalyacha tari vichar kar, tyala ekta padu nakos. Dev tuzha bhala karo...