Sunday, December 14, 2008

अजून एक कंटाळा नोंद

किती गाड्या पाहाव्यात माणसाने, आणि एक पण पसंत पडू नये - काय अर्थ आहे का? आता गाडी काय एक टायरसुध्दा बघायची इच्छा नाहिये. भयंकर म्हणजे अगदी जामच कंटाळा आला आहे ह्या प्रोसेसचा.
[बिलू गेट्सला ऍपलचे टोमणे ऐकायचा आला असेल तेवढया प्रमाणात आलाय कंटाळा]

एखादी गोष्ट विकत घ्यायचा एवढा कंटाळा येइल असे वाटले नव्हते, कुणीतरी द्या बुवा आखुड्शिंगी, बहुगुणी, स्वस्तातली एखादी गाडी :S
***

Wolfomother वाले मंद आहेत का, अशा काय ओळी

"I saw different faces n different places, I gotta’et back girl on the love train "

वैतागलेल्या सुरात म्हणातोय हे. एवढाच निरुत्साह आलाय, वेगवेगळी ठिकाणं आणि लोकं पहायचा तर परत आगगाडीत कशाला चाललास, गप गुमान घरी बस की.

इतका मार खाल्लाय संत बाईंचा तरीपण ‘कि’ का ‘की’ गोंधळ अजून संपला नाही, ‘की’च बरोबर आहे बहुतेक.

Tuesday, December 2, 2008

अजून एक कन्टाळवाणी नोंद

अशक्य कंटाळा आलाय, डोळे तारवटले आहेत आणि झोप पण येत नाहीये.

बर्फावरून चांदणे परावर्तित होउन छान संधिप्रकाशासारखा प्रकाश पडला आहे, फोटो काढायची इच्छा आहे, पण जाउन कॅमेरा कोण आणेल - काय एक आहे का, तो नीट धरा, चांगला ऍंगल पकडा, मरुदे यार, आख्खा हिवाळा आहे अजून

बरखा दत्तच्या विकी पेजवर criticism मधे कुणीतरी परवाच्या घटनेच्यावेळच्या तिच्या वागणूकीची सविस्तर माहिती टाकली होती, तासाभरात गायब ! परत टाकावी असा विचार मनात डोकावला पण कंटाळा आला, मूळ ज्याने टाकली असेल त्याला उत्साह असेल आणि कळकळ असेल तर टाकेल परत - I'm comfortably numb.

Tangerine गाणे लूप मधे सुरु आहे संध्याकाळी ७ वाजल्यापासून - आयुष्यात काहीतरी आहे ज्याचा कंटाळा नाही आला.
[लूप मधे दोन ओ असले तरी लूप पेक्षा "लुप" काय सुन्दर दिसते देवनागरीत]