Wednesday, April 29, 2009

जांभई लांबली


जांभई लांबली, पेंग न संपली
कंटाळ्याची लांबी फक्त वाढली

महिने गेले, वर्ष सरले
कंटाळ्याचे पाढे न थांबले

सर्वांचा कंटाळा करीन
सगळ्याचा कंटाळा करीन
पण कंटाळ्या, तुला कसा रे अंतरीन?

तुझाच भक्त,
Yawning Dog

***

Wednesday, April 22, 2009

अजुन एक कंटाळा नोंद

डाव्या डोळ्याच्या वरच्या पापणीमागे छोटासा फोड आला आहे त्यामुळे सारखं टोचिक वाटतंय. चष्मा तर लागला नाहीये, आत एक फोड आहे याची ग्यारंटी आहे.
सकाळपासून आत्तापर्यंत सहन केलं हे टोचणे, कधी बंद होणार हा प्रकार?
आता मात्र ह्या फोड्याचा प्रचंड कंटाळा आला आहे.

वर्गीकरण: वेदनादेही त्रासिक कंटाळा

कंटाळा नोंद झाल्यावर टोचणे थांबले तर कंटाळापंथातला आद्य चमत्कारच होईल