Tuesday, January 31, 2017

कंटाळादर्शन

या जगात, फक्त आणि फक्त कंटाळाच(if and only if, iff, फक्तक्त)  सेक्यूलर आणि सर्वसमावेशक आहे.

हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई,
कंटाळ्यात फरक नाई.
डावे, उजवे, अधले, मधले,
कंटाळ्याचेच सगळे दादले.
गव्हाळ, पिवळे, काळे, गोरे
कंटाळ्याचीच सारी पोरे.
गरीब, मध्यम वा श्रीमंत,
कंटाळ्याचेच होतात जंत.
टकलू, तुरळक, दाट केसाळ,
कंटाळ्याचे हे सगळे लव्हाळ.
स्त्री, पुरूष, बारके, मोठे,
कंटाळ्यानेच भरले यांचे कोठे.
ताई, दादा, आई, बाबा, 
कंटाळाच कंटाळा, तोबा, तोबा.
ईंजिनीअर, डॉक्टर, सुरक्षारक्षक,
कंटाळाच सर्वांचा भक्षक.
ग्रामीण, शहरी, निमनिमणी,
कंटाळ्याच्याच माळेचे मणी.
चोरपोलिस, वकील, जज्ज,
कंटाळाच शपथेला सज्ज.
.
.
.
अशा अनंत ओळी जोडता येतील.
.
.
.
देवाने आपल्यासाठी कंटाळ्याची सोय केली असतानासुद्धा, लोक टाईम मशीन बनवायचा प्रयत्न का करतात?

तांत्रिक कंटाळा

नॉन-टेक्निकल जनतेला, टेक्निकल गोष्टी समजावायचा प्रचंड कंटाळा आला आहे मला. मी काही गुगलमधे काम करणारा जेम्स बॉंड नाही. पण नीट लक्ष देवून ऐकले तर बेसिक दहावी पास मनुष्याला जे समजू शकते ते समोरच्याला तीनदा सांगूनही समजत नसेल तर काय करावे? 
...
कुठे गेले ते हिंसा हे काही उत्तर नाही म्हणणारे लोक?
कानाखाली जाळ काढावासा वाटतो आहे. (स्वत:च्या नव्हे, समोरच्याच्या)