बिनकामाची भांडणे झाली दिवसभर की अशक्य कंटाळा आणि वैफल्य येते. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा आलाय आत्ता. श्या.
दिवसाला ४ ओळी कोड करणे, ऑफिसमधे आपल्या मॉड्युलच्या प्रेमाखातर फुकट भांडणे करणे, १०-१५ कॉल्सवर तीच तीच बडबड करणे, सतत फालतु काहितरी बोलत राहणे, लोकांना नावे ठेवणे, कुचाळक्या करणे, त्याच त्याच साईट्स बघणे, बळंच कुठलातरी पिक्चर डाउनलोड करुन पाहणे, कारण नसताना कायम रेडिओ, गाणी ऐकणे. २-४ पुस्तके वाचुन स्वत:ला फार हुशार समजणे.
खल्लास. बास...
ह्याच्याशिवाय आपण काय केले गेल्या ४-५ वर्षात ह्या विचाराने एक होलसम असा कंटाळा आला आहे. काय अर्थ आहे का आयुष्यात राव? पण माझ्याच आयुष्यात काय, जगातच अर्थ नाहिये च्यायला.
Janis Joplin एकदा म्हणाली होती - Tomorrow never happens, it's all the same fucking day.
एलियन्सनी हल्ला केला पाहिजे पृथ्वीवर, एकेकाला असे पकडतील ना ते अक्राळाविक्राळ, काळ्या थुंकीचे, हिरव्यापिवळ्या रक्ताचे आणि मांसातून बुडबुडे निघणारे एलियन्स, तेव्हा कळेल मग लेको तुम्हा सगळ्यांना.

***