बर्फावरून चांदणे परावर्तित होउन छान संधिप्रकाशासारखा प्रकाश पडला आहे, फोटो काढायची इच्छा आहे, पण जाउन कॅमेरा कोण आणेल - काय एक आहे का, तो नीट धरा, चांगला ऍंगल पकडा, मरुदे यार, आख्खा हिवाळा आहे अजून
बरखा दत्तच्या विकी पेजवर criticism मधे कुणीतरी परवाच्या घटनेच्यावेळच्या तिच्या वागणूकीची सविस्तर माहिती टाकली होती, तासाभरात गायब ! परत टाकावी असा विचार मनात डोकावला पण कंटाळा आला, मूळ ज्याने टाकली असेल त्याला उत्साह असेल आणि कळकळ असेल तर टाकेल परत - I'm comfortably numb.
Tangerine गाणे लूप मधे सुरु आहे संध्याकाळी ७ वाजल्यापासून - आयुष्यात काहीतरी आहे ज्याचा कंटाळा नाही आला.
[लूप मधे दोन ओ असले तरी लूप पेक्षा "लुप" काय सुन्दर दिसते देवनागरीत]
1 comment:
खरं तर मला कॉमेंट लिहायचा (वाचायचा नाही) कंटाळा आलाय. पण तुमचे पोस्ट व कन्सेप्ट ही सुखद कंटाळा देणारी आहे.
Post a Comment