Wednesday, July 22, 2009

सूक्त १

Blessed is he, who in the name of ennui and veiled excogitation within, shephards the jaded through the valley of passiveness, for he is truely creativity's keeper and finder of lost values.
Thou shalt bear the overt boredom and Lord will honor thee purity and innovation

(Book of Kantala: Psalm 1)

[पल्प फिक्शनमधला ज्यूल्सचा डायलॉग आठवला आणि आपणपण कंटाळ्याचे महत्व सांगावे असे वाटले.]

वरील सूक्ताचा अर्थ कळाला असेलच तरीपण मला स्वत:ला समजवायला हे भाषांतर -

जो कंटाळा आणि त्याअंतर्गत असलेली प्रछन्न सृजनशीलता यांच्या जपणुकीच्या हेतूने, शिणलेल्या जीवांना निष्क्रीयतेच्या अंध:कारातून बाहेर पडण्यास मदत करतो तोच देवाच्या कृपेस पात्र होतो कारण तोच नावीन्य आणि गहाळलेल्या मूल्यांचे रक्षण करतो.
तुम्ही साहजिक अशा कंटाळ्याचे स्वागत करा आणि देव तुम्हाला सृजनशीलता व पवित्रता प्रदान करेल.

23 comments:

Anup Barve said...

hya baddal nakkich talya zalya pahijet.. (pallavi joshi style madhe)

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

khup jad jad waattay re...

सर्किट said...

baapre! vachunach kaNTALA AlA.. :-p

Yawning Dog said...

Sonal,
Jad ahe he khare ahe...book of kantala jara klishtach ahe. Visheshataha pahile 17 Psalms ! Vachat raha, chintan kar, manan kar jadpana kamee hoil mag ;)

Circuit,
Vachoonch kantala :)
Abhinandan. Mhanaje bajee maralees tu, nuste vachalech nahee tar lageh sookta aachranaat anale !
Keep it up.

[Ithe comments na uttar detana amhee dnyanipurush asalyacha aav anato he dhyanaat thevave naheetar mhanal kay aachratpana ahe]

Manjiri said...

वा सूक्त विचारप्रवर्तक आहे तथापि मज एक मूलभूत शंका आहे. मंत्रद्रष्ट्या ‌महाभागांनी तिचे निरसन करावे ही विज्ञापना आहे ...
तर शंका अशी, की हे सूक्त खरंच कंटाळ्याची आराधना करण्यासाठी लिहिले आहे का? ते तर कंटाळ्याला केवळ आवरण आणि मुळ गाभा सृजनशीलता मानले आणि कंटाळा अंधारी दरी की ज्यातुन बाहेर पडण्याची उच्चारणा करते.कंटाळा आराध्य व अंतिम सत्य नाही का? जर प्रेयस purity And Innovation असेल तर कंटाळा फक्त साधन ठरले.
मंत्रद्रष्टे यावर टिप्पणी करतील का?
उपकृत
-जांभई (कंटाळयाचे Instantiation)

Yawning Dog said...

मं. अ. मा. प्र. (मंजिरी, अतिशय मार्मिक प्रश्न). हर्ष झाला वाचून.
कंटाळा हा अंतिम सत्याचा प्रारंभ आहे. कंटाळा ही एक संक्रमणावस्था आहे, मनुष्य जेव्हा प्राप्त उर्जेचे कलेद्वारे अथवा विधित कार्याद्वारे उत्सर्जन करतो तेव्हा चित्तात एक पोकळी निर्माण होते आणि ही संक्रमणावस्था सुरु होते. त्याक्षणी त्या निर्वाताला नाकारुन आपले विधित कार्य पुढे नेण्याचा सामन्यजन प्रयत्न करतात. लक्षात घेतले पाहिजे की, असा प्रयत्न केल्याने आपण नवीन उर्जेला व सृजनशीलतेला नाकारतो.
या संक्रमणावस्थेत आंतरीक सृजनशीलतेचेच सृजन होत असते. तेव्हा तुझ्या विधानात ("जर प्रेयस purity And Innovation असेल तर कंटाळा फक्त साधन ठरले.") छोटीशी सुधारणा करुन असे सांगतो की - प्रेयस purity And Innovation आहे किंतु कंटाळा त्याचे साधन नसून ‘स्त्रोत’ आहे. त्यामुळेच कंटाळ्याची साधना करणे गरजेचे आहे कारण कंटाळा हाच सृजनशीलतेचा एकमेव स्त्रोत आहे, पर्यायाने कंटाळा म्हणजेच सृजनशीलता. जसे ब्रह्मा, विष्णू, महेश हे पूजनीय तसेच त्यांना जन्म देणारी आदिमाया हीसुध्दा पूजनीयच.

शिष्योत्तमे,
उत्तर समाप्त करताना महर्षि अनुप यांची रुचा उध्दृत करु इच्छितो - "आलेला कंटाळा नाकारु नये , नसलेला कंटाळा स्वीकारु नये". पहिला भाग लक्षात घे - आलेला कंटाळा नाकारु नये. तो का नाकारु नये याचे कारण व मीमांसा म्हणजे सूक्त-१
हे सूक्त कंटाळ्याची आराधना करण्यासाठीच आहे परंतु तुला जसा हा प्रश्न पडला तसा सर्वसामन्यांना पडत नाही त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने हे समजवावे लागते त्यामुळे सूक्त १ सृजनशीलतेवर भर देवून कंटाळ्याचे संक्रमणावस्था म्हणून महत्व अधोरेखित करते.

बोर झाले नाहीतर "जांभई (कंटाळयाचे Instantiation)" याविषयी पण लिहायचे होते - अतिशय योग्य दिशेन जात आहेस तू.

अनेक आशिर्वाद

सर्किट said...

"मनुष्य जेव्हा प्राप्त उर्जेचे कलेद्वारे अथवा विधित कार्याद्वारे उत्सर्जन करतो तेव्हा चित्तात एक पोकळी निर्माण होते आणि ही संक्रमणावस्था सुरु होते."

ह्या वाक्याला माझा आक्षेप आहे. म्हणजे ते असत्य आहे असे नव्हे, पण ते पूर्णसत्य ही नव्हे. माझ्यामते ते आहे अर्धसत्य. कंटाळ्याचा तो एक प्रकार आहे, त्याला नैतिकतेची उच्चभूमी (moral high ground) प्राप्त आहे, पण म्हणून सामान्यजनांच्या कंटाळ्याला अनुल्लेखाने मारणे योग्य नव्हे.

सामान्यजनांना कलेद्वारे किंवा विधित कार्याद्वारे उर्जेचे उत्सर्जन न करता ही कंटाळा येतो. कधीकधी ती कला / विधित कार्य आपण करायला पाहिजे ह्या मानसिक दबावाखाली दीर्घकाळ वावरूनही कार्यास हात लावलेला नसल्याने कार्याबद्दलची एक प्रकारची शिसारी उत्पन्न होते, आणि ती तून ह्या हलक्या दर्जाच्या कंटाळ्याचा जन्म होतो.

कंटाळ्याचाही जन्म कुणापोटी होऊ शकतो हे सूक्तकर्त्यांनी येथे नोंद करून वाचावे. प्रजापती ब्रह्मदेवालाही बाप असतो (बरेच जण त्यांचा तो बाप बोलताना काढतातही) त्यातलेच आहे हे.

तसेच जांभई ही कंटाळ्याचे instantiation (मंजिरी, तू vhdl/verilog प्रोग्रामर आहेस काय़?) नसून ती कंटाळ्याची नांदी आहे. जसे गोंधळाला बोलावताना गोंधळी ’या देवा या’ / ’त्या देवा या’ करतात, तत्त्वत जांभई ही एकामागून एक येत आगामी कंटाळ्यासाठी पायघड्या घालत असते. म्हणूनच जांभई दिल्यावर आपण बऱ्याचदा "आई ग्गsss.. कंटाळा आला" असे म्हणतो. कंटाळ्याला पाचारण करविण्यात जी जांभई यशस्वी ठरते तीच सन्माननीय ठरते!

सर्किट said...

मंत्रद्रेष्ट्या महाभागांनी आमच्या प्रतिक्रियेवर प्रतिप्रतिक्रिया लिहीण्याचा कंटाळा केलेला दिसतो! ;-)

Yawning Dog said...

lol, uttar denare, sadhya mantradrashtyanchee tyanchya bossne jaam lavalee ahe :)

Yawning Dog said...

विलंबाबद्दल क्षमस्व.
अजून एक मार्मिक प्रश्न !
आपला आक्षेप योग्य आहे. सूक्त एक प्राथमिक सूक्त आहे, सामन्यांच्या कंटाळ्याला अनुल्लेखाने मारण्याचा मानस नव्हता.

"कधीकधी ती कला / विधित कार्य आपण करायला पाहिजे ह्या मानसिक दबावाखाली दीर्घकाळ वावरूनही कार्यास हात लावलेला नसल्याने कार्याबद्दलची एक प्रकारची शिसारी उत्पन्न होते, आणि ती तून ह्या हलक्या दर्जाच्या कंटाळ्याचा जन्म होतो."
विधानाची फोड करु
१. मानसिक दबाव आहे ते कार्य करण्याचा, बरेचदा ते कार्य आपणास प्रिय असू शकते, ते टाळण्याचीही प्रवृत्तीही नसते तरीही ते आपल्याच्याने सुरु होत नाही. [अजून अनेक कारणे असतील ते कार्य न सुरु करण्यासाठी - कदाचित ते आवडतही नसेल]
२. प्रारंभच न झाल्याने, शिसारी उत्पन्न होउन कंटाळा येतो. ( सूक्तकारां कुठल्याही कंटाळ्याला हलक्या दर्जाचे संबोधण्याची मनाई करतात)
मूळात कंटाळा हा प्रथम स्थितीमधेच आला आहे, ही स्थितीच एक संक्रमणावस्था आहे. वरकरणी असे वाटते की, मानसिक स्थितीनुसार, कंटाळा यायला नको होता कारण ऊर्जास्खलन झालेच नव्हते. परंतु आपल्या नकळतच आपण प्रारंभ करण्याच्या कंटाळ्यात प्रवेश केला असतो. एखादी गोष्ट करायची आहे किंतु प्रारंभ होईना, या अवस्थेत मन आपली गमावलेली ऊर्जा पुनश्च ग्रहण करत असते.
दुसरा कंटाळा हा मेटा-कंटाळा आहे, पहिली संक्रमणावस्था आपल्या अपेक्षा,अदमासांपेक्षा जास्त लांबल्याने, आलेला कंटाळा. हे असे कितीही कंटाळे येऊ शकतात सलग. येथे ध्यानात हे ठेवले पाहिजे की सर्वप्रथम जर तुम्ही प्रारंभच्या वेळेचा कंटाळा स्वीकारला असता तर दुसरा कंटाळा आलाच नसता. न जाणो, प्रारंभाचा कंटाळा हाही त्यापूर्वीचा एखादा कंटाळा न स्वीकारल्याने आला असेल.
संक्रमणाअवस्थेला पूर्ण होउ देणे गरजेचे आहे, बरेचदा अपरिहार्य कारणांमुळे संक्रमणावस्था पूर्ण होउ शकत नाही परंतु ती नष्ट झालेली नसते व योग्य वेळी अशा अवशिष्ट अवस्था एकत्र येउन नवीन कंटाळा येतो व तो असंबंधित अशा कार्यापूर्वी लागू होतो.
[सूक्तकारांचे आणि सूत्रबध्द लिहिण्याचे वावडे आहे, हे ज्ञात असेलच]

सार असे की,
वरकरणी तुम्हाला वाटते की ह्या कंटाळ्यातून निष्पन्न काहीच होत नाही, ना सृजनशीलता ना अजून काही त्यामुळे हा हलक्या दर्जाचा आहे परंतु तसे नसते, हा कंटाळा ही एक पूर्वीच्या अवशिष्ट कंटाळ्यांनी युक्त अशी संकलित संक्रमणावस्था असते - त्यातून काहीच निष्पन्न नाही होणार असे वाटले तरी बरेचदा त्यातून आधीच काहीतरी निष्पन्न झाले असते [वा समीपच्या भविष्यात निष्पन्न होणार असते, यावर अजून पूर्ण विचार व्हायचा आहे]
*
कंटाळ्याचा जन्म ! हा गहन प्रश्न आहे, स्वत: सूत्रकारांनी याच्या शोधात गेले अनेक वर्षे व्यतित केली आहेत. प्राथमिक अंदाज असा आहे की विविध मानवी भावना या कंटाळ्याला जन्म देतात. जर कंटाळा नोंदवही चाळलीत तर असे लक्षात येईल की, सूत्रकार प्रथम केवळ नोंदी करायचे नंतर त्यांना लक्षात आले की प्रत्येक कंटाळ्याचे वर्गीकरण होउ शकते. राग, असूया, प्रेम या प्रत्येक भावनेपोटी कंटाळा येउ शकतो
*
वरिल अनेक विधाने असंख्य नवे प्रश्न उभे करतात, पुढील सूक्तांमधे सविस्तर विषय मांडले जातीलच. परंतु कंटाळ्याविषयी विचारमंथनास प्रवृत्त करणे हाही सूक्तकारांचा हेतू आहेच.

P.S
"तसेच जांभई ही कंटाळ्याचे instantiation (मंजिरी, तू vhdl/verilog प्रोग्रामर आहेस काय़?) नसून ती कंटाळ्याची नांदी आहे..." याच्याशी अशक्य सहमत.
**

सर्किट said...

____|_|____ (हात टेकले अर्थाची स्मायली)

_____O_____ (डोकं टेकलं अर्थाची स्मायली)

Yawning Dog said...

सर्किटसर कशाला लाजवता, केवढी तारांबळ उडवलीत एका प्रश्नाने माझी :)

Manjiri said...

वा! तुमची वैचरिक जुगलबंदी वाचायला मोठी मजा येते आहे.
माझे अजुनही असे मत आहे की मंत्रद्रष्टे मूळ मुद्याला बगल देउन इथे तिथे बागडताहेत :)
पण त्याकडे लक्ष वेधायचा मला आता कंटाळा आला आहे.

जांभई ही कंटाळ्य़ाबाहेरची असुन तिचा कंटाळयाला बोलवायला नांदी म्हणता तर ते कंटाळा Instantiation पेक्षा काय वेगळे आहे? हे विशद कराल काय?

अर्थात या सर्वाचा आत्तापर्यंत कंटाळा आला नसेल तर :)

Yawning Dog said...

नाही हो, मी नाही बगल दिली. बागडताहेत :)
(खरं सांगायच तर कंटाळा यायला लागला आहेच :))

१. मी काय म्हणालो की,
"who in the name of ennui and ‘veiled’ excogitation within, shephards the jaded through the valley of passiveness"
आमच्या थेअरीप्रमाणे अंतिम ध्येय innovation/creativity असले तरी कंटाळ्याच्या अवस्थेतच ते साध्य व्हायला सुरुवात होते, vally of passsiveness/कंटाळा हेच actually तुमच्या सृजनशीलतेचे उगमस्थान आहे.
२. सामन्य कंटाळा पण महत्वाचा असतो, कारण वरकरणी जरी तो without purpose वगैरे वाटला तरी तो residual असतो बरेचदा.
३. जांभई हे कंटाळयाचे Instantiation न वाटता एक Initiation असू शकते असे मला वाटते.(Not always)
कारण मला विना-जांभई पण कंटाळा येतो मला कधी कधी.म्हणून ती बाहेरची असून, कंटाळा येणार याचे एक लक्षण असू शकते.

That's all मिलॉर्ड

सर्किट said...

objection over-ruled!

uaahh..aah..aahhhhh..yahh.. :-O

(milord chi paN hya case var vichar karayacha kanTaLa alyane ek pradeergh jaambhayee)

Amrita said...

I cant find words to appreciate..... :)
Beyond comparison. Exceptionally hilarious.
_____O_____

Manjiri said...

आता कशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरात संपली असे वाटले!

ये जुरी आपको बाइज्जत बरी (हिंदी बरी - मराठी किंवा इंग्रजी नव्हे असे म्हणण्याचा मोह आवरायचा प्रयत्न केला पण जमले नाही :))करती है!

Aparna said...

माझ्यासारख्या पामराला थोड कठीण गेल हे तत्त्वज्ञान समजावून घेताना. पण मी न कंटाळता ते वाचायला सुरुवात केली आणि सगळं वाचता वाचता मला फार कंटाळा आला. वाचून झाल्यावर फार मोठी जांभईपण दिली.
सर्वच विचारवंतांचे वैचारिक मंथन वाचून मीपण
_____O_____

यशोधरा said...

iti kantala aakhyaanam samaaptam?
itakyatach?

Yawning Dog said...

:D:D, kantala akhyanaat break ala ahe.
Akhyaan ajun poorna anhee zale

अवधूत डोंगरे said...

jabardast blog ahe.

Rohit said...

he vachtana jambhai ali. ni tyamule tumcha ani amcha yawn sambandha prasthapit zala ahe. a sha kya bhari blog ahe!

सर्किट said...

Rohit,

asha prakare yawn sambandha prasthapit hoNyasaThi tumhi doghanni sadnyaan asaNe mandatory naahi, tyamuLe tumhi doghe hi zarur to anand upabhogu shakta. :p