Wednesday, May 6, 2009

अजुन एक कंटाळा नोंद - झोपेचा कंटाळा !

हे म्हणजे फारच विचित्र. झोपेचाच कंटाळा !
Irony, Contradiction, Paradox, Deadlock असे सगळे शब्द मनात आले, हे वरचे वाक्य लिहिल्यावर.

समस्या जटिल आणि गहन आहे मित्रांनो. घाबरु नका. कंटाळा ब्लॉगवर सगळे सोप्प्या शब्दात आणि उदाहरणांनी समजावयचा पायंडा असल्याने समस्या समजावून देतो.
"मॉन्टी पायथॉन ऍन्ड होली ग्रेल" सिनेमामधे एका स्त्रीला चेटकीण/विच [‘’] ठरवण्यासाठी लोक एक व्यवस्थित तर्कशुध्द चर्चा करतात आणि संपूर्ण विचाराअंतीच तिला मारायचा निर्णय घेतात. त्या चर्चेच्या धर्तीवर खाली आपण एक छोटेखानी चर्चा करु.

सामान्य माणूस कंटाळा आल्यावर काय करतो?
सुस्कारा सोडतो

अजून
?
चहा, कॉफी पितो

ह्म्म
, बरोबर आहे पण अजून, जांss, जां...
जांभई देतो.

एक्झॅक्टली
! जांभई कशाचे लक्षण आहे?
शेजाऱ्याला पण जांभई येणार असल्याचे

होय
, बरोबर. पण अजून कशाचे लक्षण आहे ते?
आपल्याला झोप आल्याचे

येस्स
. मग जांभई आल्यावर माणूस काय करेल?
झोपेल.

आले
लक्षात?
झोपेल, झोपेल...
अरेच्या, लफडा आहे...झोपेचाच कंटाळा आला. कंटाळा आल्यावर माणूस काय करेल, जांभई देईल, जांभई आल्यावर झोपेल, पण झोपेचाच कंटाळा आला आहे, परत जांभई...रिपीट !
धिस इज फकींग इनफायनाईट लूप - ब्रेक कंडिशनच नाहिये यात.

हा ह्हा ह्हा ह्हा

...

आता माझ्या समस्येचे गांभीर्य लक्षात येईल. संत लोकांनी म्हणले होते ना - प्रसंगी लोण्याहूनी मउ, प्रसंगी वज्राहूनी कठोर. तसेच आहे कंटाळ्याचे, प्रसंगी एकदम सुलभ, तर प्रसंगी एकदम गहन !

सुलभ कोड:
if( खायचा_कंटाळा == ट्रू )
{
doउपाशीपोटी_झोप();
}


जटिल कोड:
while( जांभई == ट्रू )
{
if( !झोपेचा_कंटाळा )
{
doपेंग();
doडूलकी();
sleep(maxPossibleTime);
break;
}
continue; // OMG, continue really?
}

सहीच, mySQL इन्स्टॉल करुन कंटाळ्याची टेबल्स बनवतो !

5 comments:

Anonymous said...

अजुन एक प्रकार.. "कंटाळ्याचाच कंटाळा"
(सौजन्य: संदिप खरे)
- प्रभास

http://my.opera.com/prabhas

Bhagyashree said...

LOL... this is awesome post ! :)

Sanhita / Aditi said...

अजून एक षटकार!
मला जेवण्याआधी ग्लानी आणि जेवणानंतर सुस्ती येते.

मी बिपिन. said...

You are a confirmed NUT, Mr. DOG.

Unknown said...

Dokyat jatos re !!!!!!